मंगळवार, २० डिसेंबर, २०११

या साइट्स वर जुनी मराठी पुस्तके सुध्दा वाचता येतील www.dli.ernet.in/ व www.new.dli.ernet.in/ अगदि एकोनिसाव्या शतकातिल मराठी कथा व संदर्भग्रंथ वाचायला मजा येते,

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०११

काही ब्लॉग्ज असे :

१) गणेश मतकरी यांचा http://apalacinemascope.blogspot.com

२) परेश प्रभू यांचा http://pareshprabhu.blogspot.com

३) नितीन पोतदार यांचा http://www.myniti.com 

४) http://sujaanpalaktva.blogspot.com

५) http://chakali.blogspot.com

६) http://sahajach.wordpress.com

७) http://restiscrime.blogspot.com

८) http://mazisahyabhramanti.blogspot.com

९) http://dhondopant.blogspot.com

१०) http://aadityawrites.blogspot.com

११) http://www.2know.in

१२) http://chehare.blogspot.com

१३) http://sahajsuchalamhanun.blogspot.com

१४) http://kayvatelte.com

१५) http://vinayak-pandit.blogspot.com

राम गणेश गडकरी

राम गणेश गडकरी हे नाव नुसते उच्चारले तरी मराठी वाचकाला ‘गडकरी’नावाचे जग समोर दिसू लागते. आजच्या आधुनिक युगातला एखादा शाळकरी विद्यार्थीही ‘एकच प्याला’,’भावबंधन’सारख्या नाटकांची नावे सहजपणे सांगून जातो. गडकरी गेले त्याला आता ८५ वर्षे उलटून गेली. साधारण:२५ वर्षांची एक पिढी असा हिशोब धरला तर गडक-यांच्या मृत्यूनंतर तीन पिढ्या उलटल्या आहेत. खरं तर एवढ्या काळात एखादा लेखक आणि त्याचे साहित्य केव्हाच विस्मरणात विरून नामशेष व्हायचे. पण गडक-यांचे साहित्य ह्या न्यायाला पुरून उरले. त्यांचे लेखन अगदी काल-परवाच झाले असावे असे वाटण्या इतपत ते ताजे आणि आजच्या बदलत्या संदर्भातही सुसुंगत वाटते.

राम गणेश गडकरी या नावाचा उल्लेख ‘मराठी शेक्सपिअर’असा केला जातो. आम्ही एक वेळ इंग्लंड देऊ, पण शेक्सपिअर देणार नाही हा इंग्रजी बाणा सर्वांना परिचित आहे. त्यानुसार शेक्सपिअरचे समग्र साहित्य आज इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहे. जगभरातल्या वाचकांना आणि अभ्यासकांची फार मोठी सोय त्यामुळे झाली आहे. राम गणेश गडकरींचे समग्र साहित्य तर सोडाच, पण त्यांचे एखादे नाटकही आज इंटरनेटवर सापडत नाही. ती उणीव भरून काढण्यासाठी http://www.ramganeshgadkari.com हे संकेतस्थळ संगणक प्रकाशनने निर्माण केले आहे. त्यावर गडक-यांचे समग्र साहित्य मोफत उपलब्ध असणार आहे.

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

भारताच खरा शत्रू कोण ?


आपल परराष्ट्र धोरण नेहमीच पाकिस्तानला समोर ठेऊन आखल जात. आपल्या नेत्यांसाठी, जनतेसाठी पाकिस्तान हाच आपला प्रमुख शत्रू मानला जातोय. पण खर्च वस्तूस्थि तशी आहे का ? 

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०११

एकाकी वैभव


"दो दिल मिल रहे है...
मगर चुपके चुपके...."

शाहरुख खानच्या तोंडी हे सुंदर गाणं, महिमा चौधरीची शालीन अदा, फिल्म परदेसचं हे गीत. आठवलं ना? एकदम रोमँटिक मूडमध्ये नेणार; एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारं. या गाण्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते जिथं शुट केलंय ते ठिकाण फतेहपूर सिक्री! लाल दगडातल्या भव्य इमारती आणि महाल, नक्षीदार कमानी, जाळीदार खिडक्या भिंतीवरची लाजवाब चित्रसंपदा, साध्या-सुंदर मशिदी, श्वेतवर्णी दर्गा आणि झाडांची अधूनमधून दिसणारी हिरवाई! परदेसंच हे गाणं हिट होण्यात या फतेहपूर सिक्रीचा, इथल्या जादूई परिसराचाही मोलाचा वाटा आहे.

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०११

मॅड

लहानपणापासून सत्याण्णव हजार चारशे त्रेचाळीस  पुस्तक वाचलेली असतांना  इतका चांगला कथासंग्रह  वाचनात  कसा आला नाही ह्याच मला खूप आश्चर्य वाटलं.आणि मला लंप्याची ती ओळ आठवली.”माझ्यासारखा मॅड शोधुनही सापडणार नाही. असला मॅड म्हणजे दहा गुणिले दहा भागिले शंभर! मी. एकच!”.  मग माझ्यासारखे अजूनही काही पुस्तकवेडे महाभाग असतील ज्यांची लंप्याशी ओळख झालेली नसेल  अस वाटलं आणि  त्यांच्यासाठी हा लेखप्रपंच.खरच कधीतरी अगदी मॅड सारखे काहीतरी वाचत सुटाव अस वाटल  तर लंपनच्या मॅड  भावविश्वात जरूर प्रवेश करा … एक वेगळाच मंतरलेला मॅड अनुभव तुम्हाला मिळेल…

बंदिस्त चौकटीतील खुली अर्थव्यवस्था



-----------------------------------------------------------------------------------------------
शेती आणि ग्रामीण क्षेत्र हे उद्योग धंद्यासाठी स्वस्त धान्य आणि मनुष्य बळ पुरविणारे हक्काचे क्षेत्र आहे या आमच्या धोरणकर्त्यांच्या जुन्या धारणेत आणि धोरणात काहीच बदल झाला नाही. कृषी आणि ग्रामीण क्षेत्र या चौकटीत बंदिस्त राहिले तरच जागतिकीकरणातून फोफावणाऱ्या उद्योग व इतर व्यवसायांना वाढत्या मागणीनुसार स्वस्त मजूर आणि स्वस्त अन्न-धान्य व आवश्यक कृषी मालाचा पुरवठा शक्य आहे . शेती क्षेत्रात उदारीकरणाचा शिरकाव का झाला नाही किंवा का होवू दिला नाही याचे उत्तर यात मिळते. 
---------------------------------------------------------------------------------------------

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११

मराठी अभिजात कशी?

मराठी भाषा सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्याचा शासन प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली. त्याबाबत प्रा. हरी नरके यांनी मांडलेली मत.

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०११


प्रिय वाचकहो ! ,

'विश्वकोश' हे मराठीतील ज्ञानाचे भांडार. मराठी एन्सायक्‍लोपीडिया अ ते ज्ञ, पर्यंतच्या विश्वातील महत्त्वाच्या संज्ञांची मराठीतून ओळख सामान्य माणसाला व्हावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने तयार केलेला ग्रंथांचा संच.पण ग्रंथ जाडजूड असतात म्हणून आपण (महाराष्ट्र शासानाच्या वतीने मराठी विश्वकोश) त्यांचा ६ सीडींचा ४५० ग्रॅम वजनाचा सीडी संच तयार केला. ज्यात अ ते शे (अंक ते शेक्सपिअर विल्यम) अशा १ ते १७ खंडांची (२००७ पर्यंत प्रकाशित झालेले) २०,१८२ पाने समाविष्ट केली. जी संगणकावर कधीही बघता येतात. ह्यासाठी संगणक तज्ञ माधव शिरवळकरांनी बहुमोल मदत केली आहे.

घराघरात विश्वकोश हे त्यापुढचे क्रांतिकारी पाऊल आहे. महाजालकावर (वेबसाईटवर) विश्वकोशाचे सर्व ग्रंथ जसे आहेत त्या स्वरुपात महाराष्ट्र शासन जनतेला मोफत उपलब्ध करुन देत आहे. तेही युनिकोडमध्ये, सीडॅकच्या सहकार्याने. विश्वकोशाचे जनक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी जो १ ते १६ खंडांचा ज्ञानाचा खजिना तयार केला तो आता ऐतिहासिक दस्तऐवज आहे. तरी त्याचे महत्त्व कालातीत आहे आणि म्हणूनच इतिहासाच्या या सोनेरी खुणा आपण जतन करीत आहोत. भविष्यात पर्याप्त स्वरुपातील (अपडेटेड) विश्वकोशही याच माध्यमातून जगास स्वतंत्रपणे व मोफत अर्पिला जाईल. आज घराघरात इंटरनेट पोहोचले आहे. घराघरात संगणक आहेत. आपण त्यावर ज्ञानाचा खजिनाच उमलत्या पिढीस उपलब्ध करुन देत आहोत. त्यापैकी आजमितिस पहिला खंड युनिकोडमध्ये जसा आहे त्याच स्वरुपात तयार आहे. चित्रांसकट. जो शब्द हवा त्यावर क्‍लिक करा. सर्व माहिती उपलब्ध! तंत्रज्ञानाचा कुशल वापर, मराठीचा प्रभावी प्रसार हे विश्वकोशाचे ब्रीद आहे. यानंतर प्रतिमास १ खंड असे १५ महिन्यात डिसेंबर, २०१२ पर्यंत संपूर्ण १ ते १८ खंड युनिकोड माध्यमातून सीडॅकच्या सहकार्याने विश्वकोश महाराष्ट्र शासनाच्या वतीने जगास अर्पण करेल. अर्थात् त्याने ग्रंथांचे महत्त्व कमी होत नाहीच. पण केव्हाही, कुठेही हा ज्ञानमित्र उपलब्ध होतोय हीच आनंदाची बाब. माननीय डॉ. जयंत नारळीकर, विजया वाड, स्‍नेहलता देशमुख, अरुंधती खंडकर, रा.ग.जाधव, भालचंद्र नेमाडे यांनी या प्रकल्पास व्हिडिओ शुभेच्या दिल्या आहेत. हा ऐतिहासिक दस्तावेज माननीय मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते दि. २५ ऑक्टोबर २०११ रोजी जगास मोफत अर्पण झाला आहे. 'घराघरात विश्वकोश' ह्या आमच्या प्रकल्पाच्या संकेतस्थळाचा पत्ता www.marathivishwakosh.in किंवा www.marathivishvakosh.in असा आहे.

आपली,
डॉ. विजया वाड,
अध्यक्ष विश्वकोश निर्मिती मंडळ

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०११

शासन व्यवस्था


भीती हि मानवाला निसर्गाकडून  मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणावी लागेल. 
याच भीतीमुळे मानव संकटा पासून दूर राहतो. मानवाच्या आणि एकूणच सजीव प्राण्याच्या उत्क्रांतीत या भीती भावनेने खूप मोठे कार्य केले आहे. पृथ्वी वरच्या सर्वच सजीवांमध्ये हि भीती दिसून येते. 
या भीती मुळेच प्राणी आपले अस्तित्व राखण्यासाठी एकत्र टोळ्यात राहतात किवा आपला इलाखा निश्चित करून त्यात राहतात. 
पूर्वी याच भावनेतून मानव हि  टोळ्यात राहत होता. पण मानवाच्या  एकूण असतूष्टतेमुळे  मानव दुसऱ्या टोळ्यांवर अधिकार गाजवू लागले. त्या टोळ्यांला आपल्या अधिपत्या खाली ठेवण्यासाठी  शासन व्यवस्था निर्माण झाली. लोकांनी आपल्या शासकाच्या अधिपत्या खाली रहायचे, तो बोलेल तसे वागायचे. यात मानवाच्या हजारो लाखो पिढ्या बरबाद झाल्या आहेत.

आणि आज हि तेच चित्र जगभर पहायला मिळते. वास्तविक हि मानवी जीवनात आलेली मोठी  विकृती आहे. अश्या प्रकारे शासन व्यवस्था निर्माण करण्यामुळे लोकांचा काही फायदा झालाच नाही उलट त्यांचे नुकसानच अधिक झाले आहे. जागतिक युध्द, देशादेशातील युध्द याच शासन अरेरावितून उत्पन होतात. 
शासकांनी २० व्या शतकात  शासन करण्याचे आपले धोरण  बदलले  आणि त्याला भावनिक आधार देत लोकांना हि त्यात सामील केले तेही नावा पुरते. आजही हि  वस्तुस्थिती नाकारता येत नाही. 
वास्तविक शासन व्यवस्थेमुळे मानव अधिकच भीतीत जगू लागला आणि त्यामुळे गुन्हेगारी हि वाढली. याचा पुरावा म्हणून आपल्याला  आदिवासी वनवासी यांच्या कडे पाहता येईल. त्यांच्यात मुळातच गुन्हेगारी वृत्ती नसते. ते शासन व्यवस्थेच्या नियंत्रनात आल्या नंतरच तेही इतरांसारखा व्यवहार करू लागतात.

शासन व्यवस्थेमुळे मानव अधिक अस्वस्थ झाला आहे आणि याच अस्वस्थतेमुळे  आज भयान परिस्थिती मानवापुढे निर्माण झाली आहेत. आज मानवच आपला शत्रू बनला आहे तो एकमेकांना संपविण्याच्या हेतूने कार्यरत आहे. जर मानवाला आपली पिढी यापुढेही टिकवून ठेवायची असेल तर शासन  विरहीत समाज निर्माण करायला हवा. अर्थात यात कित्येक समस्या दिसतील. आपण हजारो वर्ष शासकांच्या गुलामगिरीत असल्यामुळे आपली मानसिकताच मुळात तिच्याशी जुळवून घेण्याची झाली आहे. त्यामुळे हे कठीण वाटेल. पण आपल्या, ज्यांना आपण रानटी म्हणून हिणवतो त्या पुर्वजांनीच याचे उत्तर देऊन ठेवले आहे.   

एकूण काय तर शासन  व्यवस्था हि सामाजिक विकृती आहे. आणि ती फार काल टिकून राहणे हि मानवासाठी घातक आहे.